नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाच्या पायाभूत सुविधांचं  नवनिर्माण  करण्यासाठी  2 पूर्णांक 3 लाख कोटी  डॉलर्सची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या गुंतवणुकीला  त्यांनी अमेरिकेतील ‘ पिढीतील सर्वात मोठी गुंतवणूक ‘ असं  संबोधल आहे .राष्ट्राध्यक्षांची “अमेरिकन जॉब प्लॅन” योजना ही कॉर्पोरेट अमेरिकेच्या हिताची असून रस्ते निर्माण आणि अन्य कामां मुळे लाखो रोजगार निर्माण केले जाणार आहेत. हवामान बदल आणि वृद्धांची काळजी घेणे यासारख्या मानवी सेवा योजनांना चालना मिळणार आहे.