नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल असा इशाराही त्यांनी दिला. नाटो समूहातील देशांच्या प्रत्येक इंच जमिनीचं रक्षण केलं जाईल. रशियानं युक्रेनविरुध्द रासायनिक शस्त्रात्रांचा वापर केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
युक्रनमध्ये अपारंपारिक शस्त्रांत्रांचा वापर झाला तरी अमेरिका युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नाही असं व्हाईटहाऊसचे प्रवक्ते जेन पाल्की यांनी गुरुवारीच सांगितलं होतं. दरम्यान, बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादेमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि युक्रेनियन लोकांसाठी अमेरिकेकडून दिलं जाणारं मानवतावादी संरक्षण आणि आर्थिक मदत याबाबत माहिती दिली.