लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन

पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहरातील “गुणवंत कामगार पुरस्कार” वितरण आणि “गाथा लोकशाहीराची” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या रविवारी (दि.1 सप्टेंबर 2019) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष अँँड. सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महानगरपालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर सचिन चिंचवडे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमाताई खापरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊरसाहेब भोईर, कामगार नेते मनोहर भिसे, यशवंत भोसले, साहित्यिक राजन लाखे, प्रकाश ढवळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. गिरीषजी आफळे, विनायक थोरात, मुकंदजी कुलकर्णी आमंत्रित आहेत.
या कार्यक्रमा संदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम राबविले जात आहेत. अण्णा भाऊंचे विचार जनमाणसापर्यंत पोहचविण्यासाठी “गाथा लोकशाहीराची” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील गुणवंत कामगार, गुणवंत विद्यार्थी आणि विशेष पुरस्कार मिळालेल्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तींचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे”.