नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक परिचारिका दिवस आहे. सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यभर रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधून तो साजरा केला जातो.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.कोविडच्या या संकटात कुटुंबाचे बंध बाजुला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांच्या त्याग, समर्पणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानाचा मुजरा केला आहे. हे योगदान जग कदापीही विसरणार नाही.

आजही डॉक्टर्स आणि तज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून त्या काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळालं आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.