नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत.
भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर भारत अभियानामुळं भारतात निर्माण झालेल्या गुंतवणूक संधींबाबत माहिती दिली.
दोन देशांमधील व्यापारी संबंध दृढ करण्यावर भर दिला जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.जयशंकर यांनी काल कतारच्या राष्ट्रीय संग्रहालयाला देखील भेट दिली. जयशंकर यांनी कतारमधल्या भारतीय समुदायाबरोबरही दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.नव्या भारताच्या उभारणीमध्ये या लोकांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.