नवी दिल्ली : तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, यासाठी सरकारनं त्या देशात जाण्यासाठी पर्यटन विषयक सूचना जाहीर केल्या आहेत. अद्याप कोणताही अनुचित प्रकार नोंद झाल्याचं निदर्शनाला आलं नसलं तरीही पर्यटकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना यात केल्या आहेत.

तुर्कस्थानला भेट देणा-या भारतीयांकडून वरचेवर तिकडच्या परिस्थितीबद्दल विचारणा होत असल्यानं ह्या सूचना दिल्या आहेत. मदतीची गरज असलेल्यांनी अंकारा इथं मदतीसाठी 90312448259 आणि 903124382195 या क्रमांकावर, तर इस्तंबूलमधल्या वकिलातींत 90212296213 आणि  902122962132 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.