नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे. हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आपण श्रीलंका भेटीवर जात आहोत, असं शाहिद यांनी सांगितलं.
या दौऱ्यात शाहिद हे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि प्रधानमंत्री महींदा राजपक्षे यांना भेटणार आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवरदने यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहे.