नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर ज्या ठिकाणी काल गोळीबार झाला, त्या तळावर भारतीय एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया हवाई दलप्रमुख आणि त्यांच्यासोबत असलेलं भारतीय शिष्टमंडळ सुखरुप असल्याचं हवाई दलानं कळवलं आहे.

जगभरातल्या महत्त्वाच्या देशांच्या हवाईदल प्रमुखांच्या परिषदेसाठी भदुरिया अमेरिकेच्या नावकि तळावर गेले आहेत. काल या तळावर एका बंदुकधार्‍यानं केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले होते. या बंदुकधार्‍यानं नंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्मघात केला होता.