नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या करता त्याचा उपयोग होईल.
बँकेनं पहिल्या टप्प्यात २५ देशांना १९० कोटी अमेरिकी डॉलर्स मंजूर केले असून फास्ट ट्रॅक प्रक्रियेद्वारे आणखी ४० देशांना कोविड -१९ चा सामना करण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
येत्या १५ महिन्यात आरोग्य आणि आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी आणखी १६० अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करणार असल्याचं जागतिक बँकेनं आपली निवेदनात म्हटलं आहे.