नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १७वी आसियान-भारत बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगोएन जुआन फुक यांच्यासह भुषवणार आहेत. आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांचे नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

आसियान देश आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात येईल. तसेच आसियान देश आणि भारत यांच्या दरम्यान संपर्कव्यवस्था, सागरी सहकार्य, व्यापार-वाणिज्य, शिक्षण तसेच क्षमतावृद्धी करणे या सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सामूहिक प्रगतीचा आढावाही घेण्यात येणार आहे.