नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात  कोरोना रुग्णांची संख्या ४०० वर गेली असल्यामुळे राज्य सरकारनं कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.
या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या लक्षणांच मूल्यमापन करून प्रशासनाला कळवू शकतात, त्यानुसार त्या नागरिकाला त्याच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली जाईल, असं राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात महटलं आहे.
राज्य सरकारनं अपोलो रुग्णालयाच्या मदतीन ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. covid-19.maharashtra.gov.in/, या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना आपल्या लक्षणाची नोंदणी करता येईल.
त्यानुसार त्या नागरिकाला लगेचच वैद्यकीय मदत  दिली जाईल. त्याचबरोबर नागरिकांनी काय करावं, काय करू नये, याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या प्रणालीमुळे राज्य सरकारला  कोरोनाबाबत राज्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवायला मदत होईल. या प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी राज्य सरकार फोन अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही सुरू करण्याचा  प्रयत्न करत आहे.