नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डायलिसिससाठी ५० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास नागरिकांना करावा लागू नये यासाठी राज्य सरकारचे नियोजन राज्यातल्या नागरिकांना डायलिसिससाठी ५० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये असे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार २ ते ३ तालुक्यांना मिळून एक अशाप्रमाणे ७५ नवी डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी सादर केला.

याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नव्या १५२ उपचार प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेमध्ये ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध होतील. त्यात गुडघा आणि खुबा बदलाच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे.

राज्यातल्या १०२ क्रमांकावर चालणाऱ्या सर्व रुग्णवाहिका बदलण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात मांडला. येत्या २ वर्षात या सर्व रुग्णवाहिका बदलण्याचे नियोजन आहे. येत्या आर्थिक वर्षात नंदूरबारचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे राज्य सरकारने ठरविले असून त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षात सातारा, अलिबाग आणि अमरावतीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आहे.