नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये एका सिरॅमिक फॅक्टरीत झालेल्या एलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार झाले असून त्यात किमान १९ भारतीयांचा समावेश आहे. खार्टूम मधल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार या स्फोटानंतर १६ भारतीय बेपत्ता आहेत. मृतांची शरीरं पूर्णपणे जळलेली असल्यानं, या बेपत्ता भारतीयांपैकी काही जणांचा समावेश मृतांमध्ये असू शकतो असही दूतावासानं स्पष्टं केलं आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या भारतीयांची यादी ही दूतावासानं जाहीर केली आहे. सात जखमी रुग्णालयात दाखल असून त्यापैकी चौघांची स्थिती गंभीर आहे. या स्फोटातून बचावलेल्या ३४ भारतीयांना सलुमी सिरॅमिक फॅक्टरीच्या निवासी संकुलात आश्रय दिला आहे. खार्टूम मधल्या भारतीय दूतावासानं मदत कक्ष उघडला असून, २४९-९२१९-१७४७१ हा आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक दिला आहे.