मुंबई (वृत्तसंस्था) : पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरण करावं, असं आज राज्य सरकारनं सुचवलं. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल, असं मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं.
पीएमसी बँकेचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशी बोलेल असं ते म्हणाले. तब्बल चार हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध आणले आहेत.
हे विलिनीकरण झालं, तर लहान खातेदारांना त्याचा नक्की फायदा होईल, असं पाटील म्हणाले.