नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने जागतिक आरोग्य संघटनेला ३ कोटी अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. चीननं यापूर्वी दिलेल्या २ कोटी डॉलर्स व्यतिरिक्त ही मदत असेल. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला मदत देणं थांबवल्याबद्दल चीनने चिंता व्यक्त केली होती.