• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • संपादकीय
  • व्हिडीओ न्यूज
  • मनोरंजन
  • सभासद फॉर्म
  • ई-पेपर
Search
साप्ताहिक एकच ध्येय
  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • संपादकीय
  • व्हिडीओ न्यूज
  • मनोरंजन
  • सभासद फॉर्म
  • ई-पेपर
Home ताज्या घडामोडी देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय – नितीन...
  • ताज्या घडामोडी
  • राष्ट्रीय

देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय – नितीन गडकरी

By
Ekach Dheya
-
September 1, 2019
697
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram

    नागपूर : परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी  मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला असून यामूळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात दिली.

    केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूर व स्वयंम्‌ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वर्धमान नगरस्थित परंपरा लॉन येथे सुशिक्षित बेरोजगारांना एम.एस.एम.ई.च्या योजनाविषयी जागृत करण्यासाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्‌घाटन त्यांच्या  हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, तर विशेष अतिथींच्या स्थानी ग्रीनक्रूड व बायोफ्युएल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर व एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार, स्वयं फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण उपस्थित होते.

    आपल्या देशात अगरबत्तीची आयात चीन मधून होत असून, यामुळे देशातील अगरबत्ती व्यवसायावर याचा परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून सरकारने आता अगरबत्तीवर तीस टक्के आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय कालच घेतला यामूळे अगरबत्ती व्यवसाय अधिक किफायतशीर होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात एम.एस.एम.ई. क्षेत्राचा वाटा हा 29 टक्के असून याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते व 40 टक्के निर्यात या क्षेत्रातून होत असून आतापर्यंत 11 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 50 टक्के, निर्यात 50 टक्के तर उलाढाल दीड लाखापर्यंत वाढविण्यास तसेच येत्या 5 वर्षात 5 कोटी रोजगार एम.एस.एम.ई. क्षेत्रात निर्माण करण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    या स्वयंरोजगार प्रेरणा अभियानात एम.एस.एम.ई. मंत्रालया अंतर्गत येणा-या नागपूर येथील एम.एस.एम.ई. विकास संस्था, खादी व ग्रामीण उद्योग विकास आयोग तसेच महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्यातर्फे राबविल्या जाणा-या योजनांचा लाभ तरुण व महिलांनी घ्यावा व आपली उद्यमशीलता वाढवून आर्थिकदृष्ट्या निर्भर बनावे, असे आवाहनही गडकरी यांनी याप्रसंगी केले.

    केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राबविल्या जाणा-या योजनासंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे या अभियानाचे मुळ उद्दिष्ट आहे. सदर अभियानाप्रसंगी लघू उद्योगाच्या संयत्रांची प्रात्यक्षिके दाखविली गेली. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामीण औद्योगिक महामंडळ, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्यातर्फे आर्थिक योजना व उपक्रमासंदर्भात तरुणांना माहिती देण्यात आली. यासोबतच बँक इंडीया, ग्रीनक्रूड व बायोफ्युएल फाऊंडेशन, नागपूर अगरबत्ती क्लस्टर संस्था यांचेही माहितीपर स्टॉल्स कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

    या कार्यक्रमात युवक, महिला बचतगटाच्या सदस्या, स्थानिक लोकप्रतिनीधी उपस्थित होते.

    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Telegram
      Previous article‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत ५ वर्षात १ लाख ६७ हजार अधिक शेततळ्याची निर्मिती
      Next articleग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन
      Ekach Dheya
      http://ekachdhyeya.com

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      ताज्या घडामोडी

      ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

      ताज्या घडामोडी

      पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध

      ताज्या घडामोडी

      बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात

      ABOUT US
      साप्ताहिक एकच ध्येय हे महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यामधून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.
      Contact us: ekachdheya17@gmail.com
      FOLLOW US
      MORE STORIES

      बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री...

      September 30, 2021

      गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं...

      March 3, 2023

      कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना...

      September 14, 2023
      Go to mobile version