नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या नाज़ि‍म कायज़ाइबेनं मेरी कोमवर मात केली. 75 किलो वजनी गटात पूजा राणी हिने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. तर आज होणाऱ्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात अमित पनघल, शिवा थापा आणि संजीत हे खेळाडू आपला खेळ सादर करतील.