नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविडप्रतिबंधक लशीच्या १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की यातल्या १६ लाख ५९ हजार मात्रा कालच्या दिवसात लाभार्थ्यांना टोचण्यात आल्या. आरोग्यसेवा कर्मचारी कोविड योद्धे आणि साठपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना वर्धक मात्रा देण्यात येत असून आतापर्यंत २ कोटी ८ लाखाहून जास्त वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत.