नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा विनामूल्य  पुरवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ कोटी ८० लाख लशींच्या मात्रा शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागानं दिली आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असून त्यासाठी राज्यांना देण्यात येणाऱ्या लशींच्या मात्रांच्या पुरवठ्याचं योग्य नियोजन केले जात असल्याचेही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.