नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. रशियानं किन्झल आणि कालिबर क्षेपणास्त्रांचा मारा करून युक्रेनची लष्करी ठाणी उध्वस्त केली. रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरु असल्याचं यात म्हटलं आहे. या प्रदेशात गेली आठ वर्ष सुरु असलेलं युद्ध संपवून निःशस्त्रीकरण करण्याच्या दृष्टीनं युक्रेन विरोधात ही कारवाई सुरु केल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे.