नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक मशाल आज जपानमधे पोचली एका खासगी विमानानं मत्सुशिमा विमानतळावर या मशालीला आणण्यात आलं. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याच्या चर्चा सुरु होत्या.

मात्र, ऑलिंपिक स्पर्धेला अजून साडेचार महिन्यांचा अवकाश असल्यामुळे यासंदर्भात आता काही बोलणं उचित होणार नाही, असं स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिलं.

या स्पर्धेच्या उद्धाटनाला 200 शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.