नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट वाचता येईल असा स्वच्छ असला पाहिजे. दुर्दशा झालेल्या नोटा तसंच चलनातून बाद ठरवलेल्या मालिकेतल्या नोटा पुनर्प्रक्रीयेसाठी पाठवाव्या असंही रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. अशा नोटा तसंच बनावट नोटा वेगळ्या काढण्याची क्षमता या यंत्रांमधे असावी. या यंत्रांची देखभाल दुरुस्ती नियमितपणे करण्याचे आणि तसं प्रमाणपत्र वेळोवेळी जारी करण्याचे निर्देश रिझर्व बँकेनं काल जारी केले आहेत.