नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा करायचा मंच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सखोल चिंतन आणि चर्चा करायचं आवाहन त्यांनी सर्व संसद सदस्यांना केलं आहे. राष्ट्रपतीपद आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत असल्यामुळे संसदेचं हे सत्र महत्त्वाचं आहे. नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले.