नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षासह १२ जणांनी काल इंफाळमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या वेळी त्यांनी त्यांच्याजवळची शस्त्रास्त्र पोलिसांच्या स्वाधीन केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांचं स्वेच्छेनं मुख्य प्रवाहात सामील झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं.
त्यांचं परत येणं देशाच्या संविधानावर आणि सरकारवर दाखवलेला विश्वास आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे जे अतिरेकी राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामील होतील त्यांच्यावर एकही गोळी चालवली जाणार नाही आणि ते एखाद्या गुन्ह्यात सामील असल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नसल्याच्या वक्तव्याचा पुर्नउच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.