नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचं सांगत माजी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलतांना त्यांनी पक्षाची संवैधानिक रचना उद्ध्वस्त केल्याबद्दल राहूल गांधी यांच्यावर टीका केली. आपण पत्र लिहिल्यापासून कॉंग्रेसमध्ये आपल्या बद्दल दुरावा निर्माण झाला असून त्यांना कोणीही प्रश्न विचारलेलं आवडत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. कॉंग्रेसच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी आपली एकही सूचना स्विकारली गेली नाही असंही त्यांनी सांगितलं.