नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरणाऱ्या नागरिकांनी गेल्या २ वर्षांमध्ये इ दाखल या तक्रार निवारण पोर्टलवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. मंत्रालयाने यापैकी ५ हजार ५९० तक्रारींची दखल घेतली असून त्यापैकी ८८९ तक्रारींच निवारण झालं असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
देशभरात ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पोर्टलची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग आणि अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी इ दाखल पोर्टल ला २ वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ काल नवी दिल्लीत एका इ पुस्तकाचं प्रकाशन केलं.