नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे.  ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

स्वच्छ भारत मोहीम म्हणजे सक्रीय लोकसहभागातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचं नायडू यांनी या वेळी सांगितलं. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी जन सामान्यांमधले सुप्त गुण हुडकले पाहिजेत, असंही नायडू यावेळी म्हणाले.