नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे 8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. सप्टेंबर 2022 मधे हा दर 10 पूर्णांक 70 शतांश टक्के होता. अन्नपदार्थांचे दर 8 पूर्णांक 33 शतांश टक्क्यांनी उतरले तर भाज्यांचे दर 17 पूर्णांक 61 शतांश टक्के उतरले असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.इंधन आणि विजेच्या दरात 32 पूर्णांक 61 शतांश टक्के घसरण झाली तर कारखान्यात उत्पादित वस्तूंचे दर 4 पूर्णांक 42 शतांश टक्के खाली आले.