नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी केलं. १९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या उद्घघाटन प्रसंगी काल त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्याचा ध्यास घेणारे सुधीर नांदगावकर यांना सत्यजित राय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
आशियाई महोत्सवाचे अध्यक्ष किरण व्ही शांताराम यांनी स्वागतपर भाषण केलं. दरम्यान मुंबईत थर्ड आय आशियाई महोत्सवाचं १२ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत इथं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले ३० चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.