मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे’चा शुभारंभ मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. डी.एन. संदानशीव यांचे ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.