नवी दिल्ली : घरगुती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे. घरगुती वापराचं विनाअनुदानित सिलेंडर मुंबईत साडेतीन रुपयांनी महाग झालं असून आता ५९४ रुपयांना मिळेल. तर व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर ३ रुपयांनी महाग झालं असून ते आता १ हजार ९० रुपये ५० पैशांना मिळेल.
वाहनात टाकायचा एलपीजीही सव्वा दोन रुपयांनी महाग झाला आहे. आता एलपीजीची किंमत प्रति लिटर ३९ रुपये ५२ पैसे झाली आहे. आजपासून हे दर लागू झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र गेल्या ३ दिवसापासून स्थिर आहेत. सध्या मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८७ रुपये १९ पैसे तर डिझेल ७८ रुपये ८३ पैशांना मिळते आहे.