नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे. बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि केंद्रीय मंत्री संजीव बलियान उत्तर प्रदेशात गंगा प्रवेश करते त्या बिजनोर इथून, तर उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी बल्लीआ इथं यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
गंगानदीच्या तटा लगतच्या परिसरातल्या जैवविविधतेचं संवर्धन करणं आणि नदीच्या तीरावर वसलेल्या गावांचा विकास करणं हा या यात्रेमागचा उद्देश असल्याचं गंगा नदी राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आकाशवाणीला सांगितलं.
उत्तर प्रदेशाच्या अनेक मंत्र्यांसह, आठ केंद्रीय मंत्री तसंच विविध जिल्ह्यांमधले अधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.