नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणं, तसंच “देखो अपना देश” ही भावना वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
“एक भारत – श्रेष्ठ भारत” आणि महात्मा “गांधींची 150 वी जयंती” ही यावर्षीच्या भारतपर्वाची मुख्य संकल्पना असल्याचं पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिक कुठल्याही प्रवेश शुल्काशिवाय आपलं कोणतंही ओळखपत्र दाखवुन दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत भारतपर्व महोत्सवाला भेट देऊ शकतात.