नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत १ हजार ६२४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार १ ते २४ जानेवारी या कालावधित परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १३ हजार ३०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर ऋण बाजारातून ११ हजार ६८० कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक काढून घेतली.