नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानमधे नगोया इथं ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि न्यूझिलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि पुर्वेकडील देशांबाबतचे धोरण मजबूत करण्यावर चर्चा केली.
नगोया इथं जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय शिखर परिषद सुरू असून या शिखर परिषदेत मुक्त व्यापार, विकास आणि आफ्रीकी देशांना आर्थिक विकासात सहकार्य करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री तोषिमित्सु मोटेगी यांच्याशीही द्विपक्षीय मुद्द्यांवर स्वतंत्र चर्चा केली.