नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा झपाट्यानं पसरत असून या भागातून सुमारे 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.

या आगीत पाच हजार एकर परिसरातलं वनक्षेत्र खाक झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच या आगीत अनेक घरं आणि वास्तू नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या भागातून जाणारे प्रमुख महामार्ग आणि अनेक रस्ते बंद केले आहेत.

हवाई बंब आणि हेलिकॉप्टरचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 500 जवान प्रयत्न करत आहेत.