नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्ली.
खेळाडूंना प्रशिक्षण आणि संलग्न सुविधा पुरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत समाविष्ट खेळाडूंना दर महिन्याला 50 हजार रुपयेही दिले जात असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.