नवी दिल्ली : सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वर्ष 1969 मध्ये सरकारने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सुरु केली. 2019-20 या आर्थिक वर्षात योजनेसाठी 160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.