नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन केले पाहिजे आणि पाण्याचा न्याय्य वापर व्हावा, यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
पाण्याच्या पारंपरिक साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याची आणि जलसंवर्धनासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यावेळी उपस्थित होते.
यमुना नदीच्या तीरावर चार घाटांवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी झाला.