मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युगांडाच्या एका प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण ६५ कॅप्सूल बाहेर काढल्या असून त्याची किंमत ७ कोटी ८५ लाख रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याने भारतात तस्करी करण्यासाठी अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचं सेवन करून आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचं कबूल केलं. त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून नंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.