गोवा : इफ्फीमध्ये ‘हार्टस ॲण्ड बोन्स’ हा ऑर्स्टेलियाचा चित्रपट प्रदर्शित झाला. युद्धाचे छायाचित्र करणारा छायाचित्रकार आणि दक्षिण सुदानी शरणार्थी यांच्यात फुलणारी मैत्रीची कथा बेन लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांशी भावनिक बंध निर्माण करतो.
या चित्रपटात शरणार्थीची भूमिका साकारणारे कलाकार ॲन्ड्रयू लुरी यांनी चित्रपटाविषयी आणि भारतीय चित्रपटांविषयी आपल्याला वाटणारे प्रेम व्यक्त केले.
हा चित्रपट खऱ्या रुग्णालयात चित्रित करण्यात आला. कॅमेरा दूरवर ठेवल्यामुळे काही डॉक्टरांनाही चित्रीकरण चालल्याचे जाणवले नाही. आम्ही खरोखरचे रुग्ण वाटल्यामुळै ते आमची प्रकृती तपासायला आल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय कलाकार सुदानमध्ये लोकप्रिय असून त्यांचे चित्रपट पाहत आपण वाढलो असे सांगून भारतीय कलाकारांसमवेत काम करायला उत्सूक असल्याचे ते म्हणाले. उत्तर सुदानमध्ये भारतीय चित्रपटांविषयी प्रचंड आदर असल्याचे त्यांनी सांगितले. तिथली जनता रात्री चित्रपट बघते. कधी कधी एका रात्रीत दोन-दोन भारतीय चित्रपट पाहते.
आपल्याकडे हिंदी चित्रपटांचा संग्रह असून अमिताभ बच्चन यांचा अभिनय आवडतो असे त्यांनी सांगितले.