मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार होऊ नयेत याकरता राज्य महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा जनजागृती उपक्रम आज सुरु करण्यात आला. मुंबईतल्या ३० विविध महाविद्यालयांमधे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
या उपक्रमाची व्याप्ती महानगरपालिका, जिल्हा आणि तालुका स्तरावर वाढवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महिला आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या इतर अनेक कामांची माहिती यावेळी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.