नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी यांच्यासह इतर खेळाडूंना राष्ट्रपतींनी गौरवलं.मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींनी आज प्रदान केला.यावेळी राष्ट्रपतींनी द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांचंही वितरण केलं.केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर,खेळाडूंचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.