नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं, आसीएसई मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर केले. १० वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ३४ शतांश टक्के तर, १२ वीच्या परीक्षेत ९६ पूर्णांक ८४ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशी माहिती परिषदेनं दिली आहे.
हे वर्ष आव्हानात्मक होतं, त्यामुळे यावर्षी गुवणत्ता यादी जाहीर केलेली नाही असं परिषदेनं म्हटलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या विषयांसाठी विद्यार्थ्यांनी शाळांतर्गत परीक्षांमधे मिळवलेल्या गुणांच्या आधारावर गुण दिले असल्याचं परीषदेनं सांगितलं. जे विद्यार्थी निकालाबाबत समाधानी नाहीत, ते विद्यार्थी, ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या, त्या विषयांसाठी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय निवडू शकतात असंही परीषदेनं म्हटलं आहे.