नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कुटुंब चालवायचं असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सहकार्याची भावना असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास स्त्री पुरुषांवर अवलंबून असतो. त्यामुळं बलवान राष्ट्राच्या निर्मितीत स्त्रियांनी समान सहभाग गरजेचा असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे. राजस्थानातल्या डुंगरपूर जिल्ह्याच्या बेनेश्वर धाम इथे ‘लखपती दीदी संमेलनात’ त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांना २५० कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आणि महिला निधी अंतर्गत ५० कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले. ‘प्रधान मंत्री वन धन योजनेमुळे’ आदिवासी नागरिकांचा विकास होत असून आदिवासी भागात पाणीपुरवठा आणि रस्तेबांधणीच्या योजना वेगाने आकार घेत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.