नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये, असे निर्देश राज्य महामार्ग पोलिस विभागानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत.

काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली अशा कामगारांकडून पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी केले आहेत. एखादा पोलिस कर्मचारी स्थलांतरित कामगारांकडून दंड वसूल करताना आढळला तर त्याला नोकरीतून बडतर्फ केलं जाईल, असा इशारा दिला असल्याचंही पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.