मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ राज्यपालांनी न दिल्यानं शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं.

राज्यपालांचा कालचा निर्णय घटनाबाह्य, अवाजवी आणि दूषित हेतूचा असल्याचा आरोप शिवसेनेनं याचिकेत केला आहे. राज्यपालांचा निर्णय घटनेतील कलम १४ आणि २१चं उल्लंघन करणारा होता, असंही या याचिकेत म्हटलं आहे. राष्ट्रपती शासन राज्यात लागू केल्यास आपण त्यालाही न्यायालयात आव्हान देऊ असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं.