पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे रस्त्यावर दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणा-या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, स्वाती काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते अमोल थोरात नगरसचिव उल्हास जगताप, सह शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद ओंभासे, एकनाथ पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, माहिती व जनसंपर्क विभागचे मुख्य लिपीक रमेश भोसले  आदी उपस्थित होते.

दापोडी येथे बांधण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाच्या मोटार वाहतुकीसाठी ७.५० मीटरच्या स्वतंत्र दोन मार्गिका व १.८० मीटरचा स्वतंत्र पादचारी मार्ग, संरक्षण भिंत तसेच पूलाची संरचना ही अस्तित्वातील आर.सी.सी. पूलाला अनुसरून व समपातळीत ठेवली आहे. तर पुलावर विद्युत विषयक कामे, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक, इत्यादींचा समावेश आहे.

या पूलामुळे मुंबई – पुणे रस्त्यावर पुण्याकडून तसेच खडकी कडून पिंपरीला जाणा-या वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. अस्तित्वातील १२५ वर्षे जुन्या हॅरीसपूलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्यामुळे इंधनाची बचत होणार असून वायू प्रदूषणात घट होणार आहे व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पूलांना सूमारे २२ कोटी ४६ लाख रुपये खर्च आला असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेने प्रत्येकी ५० टक्के खर्च केला आहे.