पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे, त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता येईल. गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत.

पावसाळ्यात अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील याबाबत आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. स्वतंत्र लँबची मागणी आहे त्यासंदर्भात मी शासनाकडे तशी विनंती करेल. यापुढे जास्त अलर्ट राहावे लागेल. तसेच जास्त व्यवस्था उभी करावी लागेल, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.