पुणे : पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख 25 हजार प्रवासी पुण्यातून श्रमिक ट्रेनमधून रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे ते हतिया (झारखंड) रवाना झालेल्या या श्रमिक ट्रेन मधुन एकुण 682 प्रवासी रवाना करण्यात आले. त्यापैकी 618 प्रवासी झारखंडला, 57 प्रवासी उड़ीसा तर 7 प्रवासी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले. आता पर्यंत पुणे येथून 1 लाख 25 हजार प्रवासी श्रमिक ट्रेनने त्या त्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत.